ब्लॉग

शरद नगर मध्येच फ्लॅट खरेदी करणे योग्य का आहे?

आम्ही फक्त फ्लॅटच विकत नाही तर त्यासोबत ४० + सुविधाही देतो

' शरद नगर ' मध्ये फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या एका उद्योजकाने मला विचारलं , " शरद नगरला एवढ्या लवकर यश कस मिळालं ? ग्राहक फ्लॅट घेण्यासाठी शरद नगर मधेच का येतात ?"
मी हसलो आणि म्हणालो , 'अजून कुठे यश मिळालेय ? ' खरं यश मिळायला खूप वेळ आहे. जे काही मिळालय तेही लवकर नाही तर तब्बल १५ वर्ष मेहनत करतोय. तेव्हा कुठे हे हाताला लागलय.
तोही हसला आणि म्हणाला 'शरद नगर ' आणि ' शरद पाटील ' हा ब्रँड बनलाय. खूप काही मिळवलसं. तुझा अभिमान वाटतो. म्हणूनच कसं काय जमवलसं? हे पाहायला आलो होतो ?
त्यानंतर खूप गप्पा रंगल्या. सुरुवात , संघर्ष आणि वाटयाला आलेलं बरंच काही चर्चेतून पुढे आलं. शेवटी जाता - जाता त्यांना मी एवढंच सांगीतलं की, मी फक्त फ्लॅट विकत नाही तर फ्लॅट घेणाऱ्याच्या मनामध्ये जे काही आहे ते मी फ्लॅट सोबतच देतो. प्रत्येक माणसाला स्वतःच्या हक्काचं घर हवं असतं. ते त्याच स्वप्न असतं. पण घर घेताना ते चांगल्या वस्तीमधे असावं , चांगला परिसर असावा. तिथे राहणारी लोक चांगली असावीत, चांगले रस्ते असावेत. मुबल पाणी मिळावं , सर्व सोयी- सुविधा असाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवहारामधे कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. आम्ही ग्राहकांच्या मनातील सर्व भावना ओळखून शरद नगर विकसित केलं आहे. थोडक्यात काय तर ग्राहकाला जे हवं ते आम्ही देतो आणि म्हणूनच ग्राहकांचा कल शरद नगर कडेच जास्त असतो.