ब्लॉग

शरद नगरची व्हॅल्यू खूप मोठी झालीय

*शरद नगर ची ' व्हॅल्यू '*

*खूप मोठी झालीय*

    स्वतःच्या हक्काचं घर घेणे हे प्रत्येकाचचं स्वप्न असतं. मात्र कुठलाही ग्राहक डोळे मिटून घर खरेदी करत नाही किंवा जवळ पैसे आहेत म्हणून कुणी घर घेत नाही. तर घर घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामधे नेमका काय फरक पडेल ? घरा बरोबरच आपल्याला कोणत्या गोष्टी अधिकच्या मिळणार आहेत? कोणत्या सोयी - सुविधा उपलब्ध होणार आहेत ? याकडे त्यांचे लक्ष असते आणि चोखंदल ग्राहक 'किमती ' पेक्षा ' व्हॅल्यू ' लाच जास्त महत्व देतात.

     सर्वच ग्राहक खरेदी करताना एकच विचार करतात की , मला जास्त काय मिळणार आहे ? माझा फायदा काय होणार आहे ? एकदा का त्याला फायदा दिसला की तो , किमतींकडे पाहत नाही. तो 'व्हॅल्यू ' कडे पाहतो. त्याला ' व्हॅल्यू ' समजली की तो खरेदी करतो. हुशार ग्राहक नेहमी उत्पादनावर पैसे खर्च करण्यापेक्षा व्हॅल्यूवर जास्त खर्च करतात. म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे ' मूल्य ' म्हणजेच 'व्हॅल्यू' वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ग्राहकाला जे हवं ते देता आलं पाहिजे.

    शरद नगर उभारताना फ्लॅट विकणे हे आमचे ध्येय नव्हते तर फ्लॅट बरोबरच ग्राहकाला जास्तीत जास्त काय देता येईल ? याचा विचार करून सर्व सोयी - सुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणूनच 'शरद नगर ' हे नाव एक ' ब्रँन्ड ' बनले आणि एकदा का कुठलीही गोष्ट ' ब्रँन्ड ' झाली की तिची ' व्हॅल्यू ' आपोआपच वाढते.

        ● *शरद यशवंत पाटील*

         *संस्थापक - शरद नगर ,*

         *वाडा , जि. पालघर*

          M- 8600001111